सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार निंबर्गी या गावात शुक्रवारी संपन्न झाला. काँग्रेस नेते सुरेश हसापुरे निंबर्गी गावचे युवा नेते गंगाधर बिराजदार यांच्या वतीने या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला उशीर झाल्याने हसापुरे यांनी आपले जास्त भाषण टाळले.
सत्ता असो वा नसो आपण शब्द दिल्याप्रमाणे कोणता समाज बघितला नाही, सर्वांसाठी काम करत आलो आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत विजय झालेल्या सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना यापुढे कोणताही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देताना आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली या पुढील आपली वाटचाल राहील असे त्यांनी यावेळी सांगितले..

















