सोलापूर : सोलापुरातील मुस्लिम समाजातील काँग्रेसचे कार्यकर्ते कोमारो सय्यद यांनी एमआयएम मध्ये प्रवेश करून राजकीय धक्का दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत त्यांनी हैदराबाद मध्ये एमआयएम पक्षात प्रवेश केला. यावेळी एमआयएम पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी एमआयएमचा शेला घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. कोमारो सय्यद हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अतिशय निकटवर्ती म्हणून समजले जातात.
यावेळी एमआय पक्षाचे सोलापूर निरीक्षक अन्वर सादात, माजी नगरसेवक गाझी जहागीरदार, ताहेर जहागीरदार, सत्तार पैलवान, मुबिन नदाफ यांची उपस्थिती होती.
एम आय एम मध्ये प्रवेश करताच कोमारो सय्यद यांना सोलापूर प्रवक्ता म्हणून नियुक्ती देण्यात आले आहे. नियुक्तीपत्र ओवेसी यांच्या हस्ते देण्यात आले. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोमारो सय्यद हे सुद्धा तोफिक शेख यांच्यासोबत एमआयएम मध्ये गेले होते. त्यानंतर 2017 सालच्या महानगरपालिका निवडणुकीचे तिकिटे वाटप करताना त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती नंतर एक वर्षानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

















