दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी व बंकलगी येथील सार्वजनिक निवडणूकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा तसेच पॅनल प्रमुखांचा एम के फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बंकलगीचे सरपंच एम के फाउंडेशनचे संचालक चंद्रशेखर सगरे व आहेरवाडीच्या सरपंचपदी निवड झालेले एम के फाउंडेशनचे दक्षिण तालुका अध्यक्ष नरसप्पा दिंदुरे यांच्या पत्नी सुवर्णा नरसप्पा दिंडुरे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
सर्व नवनिर्वाचीत सदस्य भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करतील व आपापल्या गावाला विकासाच्या बाबतीत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील अग्रेसर बनवतील असा विश्वास एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

















