Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील सीसीएच घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट ; 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 January 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात सीसीएच अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनंत येरनकोल्लू आणि जयंत येरनकोल्लू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून तब्बल तीन महिन्यानंतर या आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अनंत येरनकोल्लू, जयंत येरनकोल्लू, स्मिता येरंकल्लू यांच्यावर 12 ऑक्टोबर 2022 रोजी सोलापुरातल्या अनेक नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस तिन्ही आरोपींच्या शोधात होते. मात्र काल अनंत आणि जयंत येरंकल्लू यांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. 

या आरोपीनी शेकडो लोकांना अल्प मुदतीत जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यामुळे अनेकांनी अॅपच्या माध्यमातून कोट्यवधीची गुंतवणूक केली. त्यानंतर, अचानकच हे अॅप बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पैशांच्या मागणीसाठी तगादा लावला. त्यानंतर येरनकोल्लू बंधू अचानक गायब झाले. याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपीनी अॅड. मंजुनाथ कक्कलमेली यांच्यामार्फत जामिनासाठी उच्च न्यायालयापर्यंत दाद देखील मागितली. मात्र त्यांनी न्यायालयातून माघार घेतली. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येरनकोल्लू बंधूना अटक केली आहे.

या दोन्ही आरोपींवर अटकेची कारवाई केल्यानंतर रात्री वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. माझ्या दोघांना सोलापूर न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. आरोपी ताब्यात आल्याने तपासाच्या गतीला वेग येईल अशी प्रतिक्रिया आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली.

सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये 12 ऑक्टोबर 2022 रोजी गुन्हा दाखल होताना 31 लोकांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. फसवणुकीचा आकडा हा 41 लाख इतका होता. मात्र त्यानंतर आणखी काही लोक पुढे आले. आतापर्यंत या गुन्ह्यात तक्रार देण्यासाठी 74 लोक पुढे आले असून फसवणुकीचा आकडा हा 78 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र हा आकडा याहून जास्त असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे प्रतिक्रिया या प्रकरणातील मुख्य तक्रारदार राम जाधव यांनी दिली.

क्लाऊड मायनर ॲप अर्थात CCH ही एक अमेरिकन कंपनी असून अवघ्या काही दिवसात दाम दुप्पट करुन देत असल्याची माहिती सोलापूरकरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. अवघ्या काही दिवसात हजारो सोलापूरकरांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या अॅपमध्ये केली. सुरुवातीला पाच हजारपासून या वेबसाईटवर गुंतवणूक सुरु झाली. अनेकांना मोठा परतावा मिळाला. त्यातूनच लोकांनी गुंतवणुकीची रक्कम वाढवायला सुरुवात केली. हजारो सोलापूरकरांनी कोट्यवधीची गुंतवणूक या अॅपमध्ये केली. काहीही काम न करता केवळ मोबाईल फोनद्वारे अत्यंत कमी दिवसात दुप्पट किंवा तीनपट पैसे मिळतील या आशेवर अनेकांनी मोठी गुंतवणूक केली. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून Withdraw बंद आहे त्यामुळे पैसे बुडाल्याची शक्यता गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत.

सीसीएच स्कीम डेली रिटर्नवर जास्त चालते. अॅपवर अनेक योजना आहेत. सभासद होताना सुरुवातीला 1090 यूएसडीटी डॉलरची गुंतवणूक केली जाते. 1090 डॉलर म्हणजे 92 हजार 650 रुपयांची वर्च्युअल गुंतवणूक केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रोज सभासदाना 7 हजार 412 रुपये असे 35 दिवस मिळतात. म्हणजे 35 दिवसांत दोन लाख 59 हजार 419 रुपये अॅपच्या खात्यावर डॉलर स्वरुपात जमा होतात. दुसऱ्या योजनेंतर्गत 1624 यूएसडीटी डॉलर म्हणजे 1 लाख 38 हजार 40 रुपये गुंतविल्यानंतर 102 दिवसांत 26 लाख 48 हजार 820 रुपये मिळतात. म्हणजे प्रतिदिन 15 हजार 322 रुपये मिळतात. अशा अनेक योजना अॅपवर होत्या.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीच्या ‘जलजीवन’वर पुन्हा प्रश्नचिन्ह ; चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून ई निविदा प्रसिद्ध केली ; आंदोलन सुरू

Next Post

दुःखद ! मंद्रूपचे माजी सरपंच सूर्यकांत निंगप्पा ख्याडे यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! मंद्रूपचे माजी सरपंच सूर्यकांत निंगप्पा ख्याडे यांचे निधन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000878
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group