सचिन चव्हाण, मोतीराम राठोड यांची संत सेवालाल बंजारा समृध्दी योजनेच्या अशासकीय सदस्य पदी निवड
सोलापूर : संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बंजारा / लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहिर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे इ. व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये ३ वर्षाकरिता अशासकीय सदस्य म्हणून बंजारा / लमाण समाजाचे २ प्रतिनिधी खालील प्रमाणे नियुक्त करण्यात येत आहे.
त्यामध्ये उत्तर सोलापूर नेहरू नगर येथील सचिन मोहन चव्हाण यांच्यासह अक्कलकोट तालुक्यातील मोतीराम राठोड या दोघांची नियुक्ती राज्याच्या ग्रामविकास विभागाने केली आहे. याप्रकरणी 19 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे.