Thursday, May 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात लक्ष लक्ष नयनांनी पाहिला अक्षता सोहळा ; सिद्धेश्वर मंदिर परिसर भक्तिरसात चिंब ; भक्तांनी काढला दोन वर्षांचा कडता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 January 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ ९०० वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अनुपम अक्षता सोहळा शनिवारी दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला. ओम सिद्धरामा नम:… दिड्ड्यम् दिड्ड्यम्… सत्यम् सत्यम्… नित्यम् नित्यम् या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले अन् लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी २.०५ वाजता सुरुवात झाली. एकदा भक्तलिंग बोला… हर्र… बोला हर्र..चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता. कोरोना महामारी मुळे सलग दोन वर्षे भक्तांच्या अनुपस्थितीत झालेल्या अक्षता सोहळ्याला यंदा लाखों भक्तांची मांदियाळी होती.

शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाच्या काठ्या (नंदीध्वज) संमती कट्ट्याजवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाल्या. पंचाचार्यांचा समता ध्वज, पालखी होती. नाशिक ढोल या मिरवणुकीत होता. सात काठ्या विविधरंगी फुलांनी सजवल्या होत्या. मानाच्या पहिल्या काठीला सुंदर बाशिंग बांधलेले होते. सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत सात काठ्या आल्या. पांढरे बाराबंदी, धोतर, डोईवर पांढरा फेटा, कपाळाला गंध अशा पेहरावात लाखाे भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले.

सुहास शेटे यांनी संमती वाचनाला प्रारंभ केला. दिड्ड्यम् दिड्यम्, सत्यम् सत्यम् मंत्रोच्चारात पाच अक्षता टाकण्यात आल्या. सव्वादोन वाजता अक्षता सोहळा पूर्ण झाला. उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सिद्धरामेश्वरांचा जयजयकार केला. यानंतर दर्शनाकरता रांगा लागल्या. भाविकांनी एकमेकांना मकर संक्रातच्या शुभेच्छा दिल्या. वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड, इंग्रजी, मराठी अशा विविध भाषेतून सिद्धरामेश्वरांचा जयजयकार करत सूत्रसंचालन केले.

मान्यवरांची उपस्थिती

यंदायात्रेसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्ज्वलाताई, नातू शिखर पहारिया, बारामती वरून उपस्थित राहिलेले राजेंद्र पवार यांच्यासह उपस्थित होते. याच गॅलरीत अक्कलकोटचे मालोजीराजे उपस्थित होते. माजी आमदार दिलीप माने, संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, अमोल शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, आनंद चंदनशिवे, सोमनाथ केंगनाळकर यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार  विजयकुमार देशमुख, माजी आमदार रविकांत पाटील, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, हरीश पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मनोहर सपाटे, सुदीप चाकोते सर्वसामान्यांप्रमाणे संमती कट्याजवळ होते.

थेट प्रक्षेपण आणि स्क्रीनची सुविधा

अक्षता सोहळ्याच्या वेळी लाखो भाविकांसाठी स्थानिक वाहिन्यांनी अक्षता सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले. संमती कट्ट्याजवळ मोठ्या स्क्रीनची व्यवस्था होती.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या पालकमंत्र्यांसाठी सिद्धेश्वर देवस्थानची पहिल्यांदाच ‘व्हीव्हीआयपी’ सोय ; पोलिसांचा पत्रकारांसोबत दुजाभाव

Next Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व राजेंद्र पवार बाराबंदीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व राजेंद्र पवार बाराबंदीत

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979388
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group