सोलापूर – तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10 हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत ‘प्रतिबंधक विभागाने एका होमगार्डला रंगेहाथ पकडले आहे.
दत्तात्रय आण्णाराव मोटे पद होमगार्ड मोहोळ पथक (रा. नांदगांव ता. मोहोळ जि. सोलापूर) असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या होमगार्डचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे पती विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदार याचे पती अटकेत असुन त्यांना लवकर जामीन करून देण्याकरिता तसेच सदर गुन्हयामध्ये तक्रारदार यांची गाडी न दाखविण्याकरिता साहेबांच्या नावाने 15 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करून ती लाच रक्कम स्विकारलेवरून आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.