Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप माने : राजकीय वादळापूर्वीची शांतता ; वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 August 2024
in political, solapur
0
दिलीप माने : राजकीय वादळापूर्वीची शांतता ; वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

Oplus_0

0
SHARES
632
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिलीप माने : राजकीय वादळापूर्वीची शांतता ; वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने. सोलापूर जिल्ह्यातील सहकार, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. सहकारामध्ये तर त्यांचा हात कुणीच पकडू शकत नाही असे अनेक किस्से यापूर्वी पाहायला मिळाले एकण्यात आले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ या सहकारी संस्थांमध्ये त्यांचे कायम वर्चस्व राहिले आहे.

सध्या दिलीप माने हे वादळापूर्वीची राजकीय शांतता असं काहीसं चित्र दिसून येते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून शहर मध्य या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले तेव्हापासून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यानंतर वाटत होते ते मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील परंतु ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही  जवळचे मानले जातात. विधान परिषदेसाठी त्यांची चर्चा झाली परंतु राज्यातील समीकरणे बदलली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक झालीच नाही तरीही ते शांत राहिले.

मागील चार वर्षांमध्ये राज्यात अनेक वेळा राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे दिलीप माने हे शांत आहेत.  आपली राजकीय भूमिका ते स्पष्ट करत नाहीत. माने हे नक्की कोणत्या पक्षात असाही प्रश्न उपस्थित केला जातो. दक्षिण सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला. याच मतदारसंघातून दिलीप माने हे 2009 मध्ये काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. 2014 साली त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवली त्यातही त्यांना अपयश आले. 2019 मध्ये बदललेली राजकीय समीकरणे आणि परिस्थिती पाहून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्री यांना मिळालेल्या मतानंतर दिलीप माने यांनी शहर मध्य मतदारसंघात जाऊन आणि काँग्रेस सोडल्याबद्दल चूक केली अशी ही चर्चा ऐकण्यास मिळाली.

आता पुन्हा दिलीप माने यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा होत आहे. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघावर फोकस करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या भागात त्यांची संघटन बांधणी भक्कम आहे.  लोकसभा निवडणुकीतील वातावरण पाहून आणि कार्यकर्त्यांच्या इच्छे खातीर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात येण्याचे ठरवले आणि त्यांनी प्रवेश केला.

दक्षिण मध्ये माजी आमदार दिलीप माने आणि दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या विरोधात पक्षातीलच एक गट सक्रिय झाला आहे. या गटाला दिलीप माने आणि सुरेश हसापुरे नको आहेत परंतु जसे उत्तर सोलापूर तालुक्यात दिलीप माने आणि काका साठे एकत्रित आल्यास काहीही होऊ शकते तसेच दक्षिण मध्ये माने आणि हसापुरे एकत्रित आल्यास निश्चित बदल घडेल अशी चर्चा आहे.

Tags: CongressDilip Mane birthdayदक्षिण सोलापूर
SendShareTweetSend
Previous Post

दिलीप मानेंच्या वाढदिवसाचे जोरदार मार्केटिंग ; यंदाचे नवीन ‘स्लोगन’ सर्वांचे वेधतेय लक्ष

Next Post

दिलीप मानेंचा वाढदिनी सत्कार की, विधानसभेचे शक्ती प्रदर्शन ; माने यांनी जपले राजकीय ऋणानुबंध

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971288
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group