दिलीप माने : राजकीय वादळापूर्वीची शांतता ; वाढदिनी स्पेशल रिपोर्ट
सोलापूर : माजी आमदार दिलीप माने. सोलापूर जिल्ह्यातील सहकार, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. सहकारामध्ये तर त्यांचा हात कुणीच पकडू शकत नाही असे अनेक किस्से यापूर्वी पाहायला मिळाले एकण्यात आले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ या सहकारी संस्थांमध्ये त्यांचे कायम वर्चस्व राहिले आहे.
सध्या दिलीप माने हे वादळापूर्वीची राजकीय शांतता असं काहीसं चित्र दिसून येते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून शहर मध्य या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले तेव्हापासून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यानंतर वाटत होते ते मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील परंतु ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जवळचे मानले जातात. विधान परिषदेसाठी त्यांची चर्चा झाली परंतु राज्यातील समीकरणे बदलली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक झालीच नाही तरीही ते शांत राहिले.
मागील चार वर्षांमध्ये राज्यात अनेक वेळा राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे दिलीप माने हे शांत आहेत. आपली राजकीय भूमिका ते स्पष्ट करत नाहीत. माने हे नक्की कोणत्या पक्षात असाही प्रश्न उपस्थित केला जातो. दक्षिण सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला. याच मतदारसंघातून दिलीप माने हे 2009 मध्ये काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. 2014 साली त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवली त्यातही त्यांना अपयश आले. 2019 मध्ये बदललेली राजकीय समीकरणे आणि परिस्थिती पाहून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्री यांना मिळालेल्या मतानंतर दिलीप माने यांनी शहर मध्य मतदारसंघात जाऊन आणि काँग्रेस सोडल्याबद्दल चूक केली अशी ही चर्चा ऐकण्यास मिळाली.
आता पुन्हा दिलीप माने यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा होत आहे. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघावर फोकस करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या भागात त्यांची संघटन बांधणी भक्कम आहे. लोकसभा निवडणुकीतील वातावरण पाहून आणि कार्यकर्त्यांच्या इच्छे खातीर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात येण्याचे ठरवले आणि त्यांनी प्रवेश केला.
दक्षिण मध्ये माजी आमदार दिलीप माने आणि दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या विरोधात पक्षातीलच एक गट सक्रिय झाला आहे. या गटाला दिलीप माने आणि सुरेश हसापुरे नको आहेत परंतु जसे उत्तर सोलापूर तालुक्यात दिलीप माने आणि काका साठे एकत्रित आल्यास काहीही होऊ शकते तसेच दक्षिण मध्ये माने आणि हसापुरे एकत्रित आल्यास निश्चित बदल घडेल अशी चर्चा आहे.