प्रणिती शिंदे निकटवर्तीय सुरेश हसापुरे यांनी मागितली दक्षिणची उमेदवारी ; नरोटे व हसापुरे यांनी का मारली एकमेकांना मिठी ; हसापुरेंचा असा आहे राजकीय इतिहास
सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय समजले दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला.
यावेळी सुभाष पाटोळे, संतोष पवार, मोतीलाल राठोड, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष संगमेश बगले, जयशंकर पाटील, सरपंच बनसिद्ध बंन्ने, शिवलिंग बगळे, शाम व्हनमाने, सुधाकर जोकारे, अकबर मकानदार, माजी उप महापौर राजेंद्र कलंत्री, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, सागर उबाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान अर्ज दिल्यानंतर सुरेश हसापुरे आणि चेतन नरोटे यांनी एकमेकांना नकळत आमदारकीच्या मिठी मारत शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.
असा आहे सुरेश हसापूरे यांचा राजकीय इतिहास
1989 पासुन राजकारणात..निंबर्गी
गावचे उपसरपंच म्हणुन कामाला सुरुवात पुर्वी पासुन कॉंग्रेस पक्षात ते आजपर्यंत..अनेक ग्रामपंचायत व सोसायटीवर सत्ता, जिल्हा परिषद सदस्य म्हणुन भरीव कामगिरी, मार्केट कमिटी उपसभापती म्हणुन शेतकरी हिताचे निर्णय, डी सी सी बॅक संचालक म्हणून 15 वर्ष काम केले. अनेक गरजू शेतकरी वर्गाना कर्ज वाटप करुन स्वावलंबी बनवून जातीपातीचा राजकारण न करता तडीताफडी गोर गरिबांना न्याय देणारा कार्यकर्ता, सोलापूर जिल्ह्य़ातील अनेक मातब्बर नेत्यांबरोबर जसे की स्व. गणपतराव देशमुख असो सुधाकरपत परिचारक असो तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ते आताचे तत्कालीन मुख्यमंत्री देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे, याच्यासोबत प्रामाणिक काम करणारे नेतृत्व.. आणि दुसर्या फळीतील नेतृत्व रणजीतसिंह मोहिते पाटील नूतन खासदार प्रणिती शिंदे ते आमदार सजंयमामा शिंदे असो की आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, जिवलग मित्र विजयराज डोंगरे या सगळ्याशी मैत्री टिकवून राजकिय चाणक्य म्हणून ओळख आहे. कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना सुद्धा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंच्या विश्वासला पात्र राहुन काम करत आहेत, त्यामुळे आता तरी भुमीपूत्राला संधी मिळेल का? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. दुध संघावर ते सध्या काम पाहत आहेत. प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्य़ात 8 लाख 39 हजाराहून अधिक असणारा लिंगायत समाज पाहता निकटवर्तीय विश्वासूला सधी देतील का?