Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार सचिन कल्याणशेट्टी, अविनाश महागांवकर, रोहन व मनीष देशमुखांना कोर्टाकडून दिलासा ; काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 January 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-बनावट कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासवून महाराष्ट्र शासनाकडील मंजूर रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी लोकमंगल मल्टीस्टेट को.आँप. सोसायटी, बीबी दारफळ या सोसायटीचे संचालक 1)आ.सचिन कल्याणशेट्टी २)रोहन सुभाष देशमुख 3)रामराजे राजेसाहेब पाटील 4)अविनाश लक्ष्मण महागांवकर 5)प्रकाश वैजिनाथ लातुरे 6)बशीर बादशहा शेख 7)मुरारी शिंदे 8)हरिभाऊ चौगुले 9)भिमाशंकर नरसगोंडे 10) मनीष सुभाष देशमुख रा. सर्व रा.सोलापूर यांचा जामीन अर्ज प्रथम न्याय दंडाधिकारी श्री.भंडारी सो यांनी मंजूर करून सर्वांची रु. 15000/- जातमुचलका व जामिनावर मुक्त करणेचा आदेश पारित केला.

यात हकीकत अशी की,

दिनांक २४/०६/२०१५ रोजी लोकमंगल मल्टीस्टेट को.ऑप सोसायटी लि. बाळे तालुका उत्तर सोलापूर, जि. सोलापूर या संस्थेचे तत्कालिन संचालक मंडळातील रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजीनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेटटी, बशीर बादशहा शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ घनाजी चौगुले, भिमाशंकर सिद्रात नरसगोडे या संचालक मंडळाने शासनाची राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत १० मे.टन क्षमतेचा दुध भुकटी प्रकल्प व ५० हजार लिटर प्रतिदिनी क्षमतेच्या दुग्धशाळेचे एक लाख लि. प्रतिदिनी पर्यंत विस्तारीकरण करणेकरीता राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत अनुदान मिळणेबाबत प्रस्ताव सादर केला होता.

 दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून सदर संस्थेचे प्रस्तावाची तपासणी चालू असताना विभागाने संबंधित संस्थेस वेळोवेळी आवश्यक ते कागदपत्रे नुसार कळविल्याप्रमाणे त्या संस्थेने १) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र २) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंदाजपत्रकातील दरसुची डीएसआर प्रमाणे असलेबाबत दि.२२/८/१७ चे पत्र ३) महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे प्रमाणपत्र ४) अन्न व औषध विभागाचे प्रमाणपत्र ५] कारखाना अधिनियम परवाना नोंदणी प्रमाणपत्र इ. परवाना प्रमाणपत्रे सादर केली. तक्रारदार आप्पाराव गोपाळराव कोरे रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर यांनी सदर लोकमंगल मल्टीस्टेट हर को. ऑप. सोसायटी या संस्थेने प्रस्ताव सादर करताना दिलेली कागदपत्रे खोटी व बनावट आहेत अशा मजकुराची तक्रार फिर्यादी खात्याकडे केली होती. 

यावरून लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप. सोसायटी या संस्थेचे नमूद पदाधिकारी यांनी विविध शासकीय खात्याकडून प्रस्तावासाठी आवश्यक असणारी परवाना प्रमाणपत्र (दस्तऐवज बनावट तयार करुन ती बनावट आहेत असे माहिती असताना कार्यालयास प्रस्तावासोबत सादर करून त्याआधारे शासनाची फसवणुक करुन महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग आदेशाने सदर दुग्धशाळा विस्तारीकरण व दुध भुकटी प्रकल्प उभारणीसाठी एकुण २४ कोटी ८१ लाख रूपये मंजुर करून घेतले आहेत.

त्यापैकी रक्कम रू. 4 कोटी 95 लाख सबसिडी शासनाने वितरीत केली. त्यामुळे शासनाची फसवणूक झाली अशी फिर्याद दुग्ध विकास अधिकारी यांनी सदर बझार पोलीस स्टेशनला दाखल केलेली होती. 

यात सर्व आरोपींतर्फे जामीन अर्जावर युक्तिवाद करताना अँड. संतोष न्हावकर यांनी वितरित केलेली सबसीडीची रक्कम बँकेच्या व्याजासहित शासनास परत करणेत आलेली आहे, त्यामुळे अपहाराचा प्रश्नच उदभवत नाही, तपास पूर्ण झालेला आहे असे न्यायालयाचे निदर्शनास आणून त्यापृष्ठर्थ सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे निवाडे सादर करण्यात आले. सदरचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.

यात आरोपींतर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड अर्चना कुलकर्णी, अँड. वैष्णवी न्हावकर, अँड. राहुल रुपनर, सरकारतर्फे अँड.जोशी तर मूळ फिर्यादी तर्फे अँड. पवार यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : 1 लाखाची लाच घेताना मंडल अधिकारी व खाजगी इसमाच्या हातात अँटीकरप्शनच्या बेड्या

Next Post

शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची होणार चौकशी ; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली ही माहिती ; स्वामींच्या उपक्रमाचे कौतुक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची होणार चौकशी ; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली ही माहिती ; स्वामींच्या उपक्रमाचे कौतुक

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979120
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group