Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या गड्डा यात्रेत असे कोणते आहे मल्टीमीडिया प्रदर्शन ; जिथे पुस्तक खरेदीवर मिळते 10 ते 60 टक्के सूट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 January 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर. दि.२० – केंद्र शासनाच्या ८ वर्षे सेवा सुशासन गरीब कल्याण योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मल्टीमीडिया प्रदर्शन उपयुक्त असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूरच्या वतीने श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित होम मैदानावरील प्रदर्शनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रकाशन विभागाचे उपसंचालक उमेश उजगर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, देवस्थानाचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळवे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राजशेखर पाटील, निवृत्त अधिकारी सतीश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री शंभरकर म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा देदीप्यमान कामगिरी केलेल्या अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास येथे बघू शकतो.

यावेळी काडादी म्हणाले, नवीन पिढीला स्वातंत्र्य चळवळीतील  इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे प्रभावी माध्यमाद्वारे त्यांच्यासमोर स्वातंत्र्य चळवळीतील इतिहास ठेवणे गरजेचे आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय इतिहास पाहता येईल. या प्रदर्शनामध्ये जनकल्याणकारी योजनांची माहितीचा उपयोग लोकांनी करून घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.

हे प्रदर्शन सर्वांसाठी पाच दिवस मोफत आहे. तसेच सदरील प्रदर्शन आपल्याला व्ही आर आभासी तंत्रज्ञानावर आधारितही पाहता येणार आहे. आजादी क्युस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्याना गेमिंग अपद्वारे आकर्षक बक्षिस आणि ई-प्रमाणपत्र ही जिंकता येणार असल्याचे श्री अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितले.

प्रदर्शनाच्या स्थळी प्रकाशन विभागाची अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके  वाचकांना विशेष सवलतीच्या दरात या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विध्यार्थी, विविध विषयांचे अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी ही पुस्तके अतिशय उपयुक्त आहेत. प्रदर्शनकाळात पुस्तकांच्या खरेदीवर किमान 10 ते कमाल 60 टक्क्यापर्यंत सवलत दिली जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा त्यात समावेशआहे.  प्रकाशन विभाग ही भारत सरकारची एक प्रमुख प्रकाशन संस्था असून इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान आणि क्रीडा, गांधीसाहित्य, बालसाहित्यअशा विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके तसेच राष्ट्रीय  नेत्यांची  भाषणे, मान्यवरांची चरित्रे  यांचा विपुल संंग्रह प्रकाशन विभागाकडे अतिशय वाजवी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय योजना, कुरुक्षेत्र, बालभारती आणि आजकल ही मासिके या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि त्यांची वर्गणीदेखील स्वीकारली जाणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंबादास यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, ग्लोबल मिडिया संस्थेच्या विज्ञा रॉय आणि भूषण डोळस यांनी परिश्रम घेतले. पाच दिवसाच्या कालावधीमध्ये सकाळी ११:३० ते दुपारी ०३:०० वाजे पर्यंत भैरव मार्तंड व जयभवानी कलापथकाचे मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहता येणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

राजा माने यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; या पुरस्काराने झाला सन्मान

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात डंपरखाली चिरडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ; छत्रपती संभाजी चौकातील घटना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात डंपरखाली चिरडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ; छत्रपती संभाजी चौकातील घटना

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000694
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group