सोलापूर : रविवारी सायंकाळी साधारण सव्वा पाचच्या सुमारास जुना पुना नाका येथे डंपर क्रमांक एम एच 13 सीयु 4987 डंपरच्या खाली येऊन एका दहा वर्षे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सदरील घटना घडताच लोकांनी डंपर गाडीला थांबवून ठेवले. त्यावेळी बघायची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांना सर्व घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. एक कुटुंब आपला लहान मुलगा व एक मुलीला घेऊन शहराकडे येत असताना हा अपघात घडला आहे. अपघात घडताच मोठ्या प्रमाणात आक्रोश सुरू होता. यावेळी काही काळ सदर घटनेच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली होती.