राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त भोगावात महिलांची आरोग्य तपासणी ; उज्वला पाटील यांचे आयोजन
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 19 जून रोजी महिलांसाठी सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा उज्वला पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान श्रद्धा मंगल कार्यालय भोगाव टोल नाक्याजवळ होणार असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ पाथरुडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ सागर मंगेडकर, डॉ अंजली पारशेट्टी, डॉ सोनाली रणदिवे हे तपासणी करणार आहेत.
डोकेदुखी, मान-पाठ दुखी, सर्दी खोकला, ताप, व इतर आजार तसेच उच्च रक्त दाब, मधुमेह व कॅन्सर सारख्या आजारांवर मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात येणार असून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.