आईच्या खुनातील मुलगी व तिचा प्रियकर निर्दोष ; सोलापूरच्या या गावात घडली होती घटना
सोलापूर- आईने स्वतःच्या जावयाशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याने चिडून तिच्या मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने कुमठे गावातील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या स्वतःच्या जन्मदाती आईचा टाँवेल ने गळा आवळून खून केल्याप्रकरणी मुलगी अनिता महादेव जाधव व शिवानंद भिमप्पा जाधव दोघे रा.कांकडकी,जि.विजयपूर यांची मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आय.ए.शेख यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकिकत अशी कि, दि.८/११/२० रोजी पहाटे ५.३० वाजता फिर्यादी कविता हणमंतू भोसले हि घरामध्ये पीठ मळत होती. त्यावेळी विजय परशुराम भोजे हा फिर्यादी चे घरी पळत पळत आला व त्याने फिर्यादीस मोठ्याने आवाज देऊन वहिनी घराबाहेर या असे म्हणाला त्यामुळे फिर्यादी हि घराबाहेर आली त्यावेळी विजयने फिर्यादीस तिची नणंद लक्ष्मीबाई मेली असे सांगून जोरात पळून गेला. तेवढ्यात फिर्यादी चे पती हणमंतू व घराशेजारील शहनाज शेख तसेच परिसरातील आजूबाजूचे लोक घराबाहेर आले व त्यांना फिर्यादी ने सगळी हकिकत सांगितले. त्यानंतर फिर्यादी व तिचे पती दोघेही मयत लक्ष्मीबाई घरी गेले असता त्याठिकाणी लक्ष्मीबाई हि उताणे अवस्थेत निपचित पडलेली दिसली. तिचे पायाच्या नखातून डोक्यातून रक्त येत होते,चेहऱ्यावर व गालावर काळपट वण होते. त्यांना जागीच मयत झाल्याचे लक्षात आल्याने त्याठिकाणी जमलेल्या लोकांतून एकाने पोलिसांना काँल केला व लक्ष्मीबाई हिचा खून झाल्याचे सांगितले व विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांना खूनाचा तपास करताना मयत लक्ष्मीबाई हिची मुलगी अनिता जाधव व शिवांनंद जाधव या दोघांनी घटनेच्या दिवशी रात्री मयताच्या घरी येऊन तिच्याशी वाद करून तिला मारहाण करून टॉवेलने गळा आवळून खून करून तिची पर्स मोबाईल व रक्कम घेऊन गेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपींना अटक केली.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध सखोल तपास करून मे.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सुनावणीवेळी गुन्हा शाबीत करण्यासाठी खटल्यात सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी परिस्थितीजन्य पुराव्याचे साक्षीदार महत्वाचे होते.
यात आरोपीतफे युक्तिवाद करताना अँड संतोष न्हावकर यांनी फिर्यादी व साक्षीदारांचा जवाब विश्वासार्ह नाही तसेच पोलिसांनी आरोपींविरुद्ध खोटे पुरावे तयार केल्याचा संशय निर्माण होतो असे मे.न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अँड.संतोष न्हावकर, अँड वैष्णवी न्हावकर अँड. राहुल रूपनर अँड जयराज नंदुरकर यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. गंगाधर रामपूरे यांनी काम पाहिले.