सोलापूर : आई प्रतिष्ठान व संत सेवालाल महाराज मूर्ती वाटप बंजारा जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने “बंजारा समाज प्रबोधन मेळावा” आणि “संत सेवालाल महाराज १०१ पूर्णाकृती मूर्ती वाटप सोहळा” शनिवारी दुपारी चार वाजता संत सेवालाल महाराज मंदिर परिसर, नेहरू नगर, विजापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू बाबूसिंग महाराज, जितेंद्र महाराज, जगनू महाराज यांच्यासह माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह मान्यवरांची मोठी उपस्थिती राहणार आहे.
तसेच यावेळी बंजारा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान संत सेवालाल महाराजांचे कार्य आणि शिकवण सर्वत्र पोहोचावी आणि समाजबांधव एकत्र यावेत या उद्देशाने संत सेवालाल महाराजांच्या १०१ पुर्णाकृती मूर्त्यांचे समाजबांधवांना वितरण करण्यात येणार असल्याचे आई प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश राठोड यांनी सांगितले



















