सोलापूर – चार वर्षापूर्वी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे कामास आठवड्याभरात चालना न मिळाल्यास सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील नागरीकांच्या पाणीप्रश्नासाठी आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी महानगरपालिका आयुक्तांना भेटून सांगितले. याशिवाय सोलापूर शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कर, पार्क मैदानावर टेनीस बॉल क्रिकेट सामन्यास परवानगी देऊ नका अशी मागणीही माने यांनी निवेदनाद्वारे केली.
सोलापूर शहर हद्दवाढ भागातील जनतेच्या पाण्यासाठी केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उजनी – सोलापूर समांतर पाईप योजना मंजूर करण्यात आली देशाचे प्रधानमंत्र्यांचे हस्ते चार वर्षापूर्वी या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ झाला गेली तीन वर्षापासून उजनी जलाशयात तुंडूब पाणी आहे. मात्र समांतर पाणीपुरवठा योजना पूर्ण न झाल्याने सोलापूर शहरवासीयांना 3-4 तर हद्दवाढ भागातील जनतेला 4-5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सदरच्या समांतर जलवाहिनीचे कामास आठ दिवसात चालना न मिळाल्यास मी शहरवासीयांसह आंदोलन करणार असल्याचे माने यांनी आयुक्तांना सांगितले.तर समातंर पाईप लाईन पुर्ण होईपर्यत नागरीकांना 50 टक्के पाणीपट्टी आकारणी करण्याची मागणी केली.
दिल्ली, मुंबई शहरातील हवामानातील सततच्या बदलामुळे प्रदूषण वाढले असून सोलापूर शहरात देखील प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नागरीकाच्या आरोग्याचे दृष्टीने गड्डा यात्रेदरम्यान प्रदूषण नियंत्रक मशनरी उभा केली. त्याप्रमाणे शहरात देखील दक्षता घेणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते रात्रीच्या वेळी स्वच्छ करावेत, धूळ उडणाऱ्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारावेत, बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पडदे बंधनकारक करावेत, कचरा रोजचे – रोज उचलावा असे उपाययोजना करण्याची मागणी केली.
समांतर जलवाहिनी कामासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे प्रयत्ऩ सुरु असून सोलापूर शहरवासीयांच्या महत्वाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी योग्य अमंलबजावणी करण्याचा प्रयत्न करेन असे आयुक्त़ शितल उगले-तेली यांनी सांगितले. शहराचे दृष्टीने महत्वाचे विषय हाती घेतल्याने नागरीकांनी माने यांचे कौतुक केले.
सोलापूरच्या पार्क मैदानाचे सुशोभिकरण, सोयी-सुविधा केल्यामुळे हे स्टेडीयम आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे. तर भविष्यात बी.सी.सी.आय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महत्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र या अद्यावत मैदानावर टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धे परवानगी दिली जात असल्याने खेळपट्टी व मैदानाचे अस्तीत्वच धोक्यात येणार आहे. त्यामुळे या मैदानावर टेनीस बॉल क्रिकेट सामन्यास परवानगी देवू नये अशी मागणी केली यासंदर्भात स्टेडीयम कमेटी बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले
यावेळी ब्रह्मदेवदादा माने बँकेचे संचालक सोमनाथ गायकवाड, शावरु वाघमारे, महेश घाडगे, परमेश्वर कलशेट्टी, प्रदीप सुरवसे, राहूल जाधव, विकास कदम, अनिल हिबारे, श्रीकांत मेलगे-पाटील, राजू पाटील, सचीन चौधरी, नितीन भोपळे आदिसह शहर व हददवाढीतील कार्यकर्ते उपस्थित होते.




















