Friday, July 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पत्नीच्या खूनाचे आरोपातून पती निर्दोष ; ऍड. संतोष न्हावकर यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 June 2024
in crime
0
पत्नीच्या खूनाचे आरोपातून पती निर्दोष ; ऍड. संतोष न्हावकर यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा
0
SHARES
371
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पत्नीच्या खूनाचे आरोपातून पती निर्दोष ; ऍड. संतोष न्हावकर यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

सोलापूर- चारित्र्याचे संशयावरून पत्नीचा सपासप वार करून खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सिध्दू किसन हराळे रा.हराळेवाडी, ता.मोहोळ याचेविरुध्द भरलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आय.ए.शेख यांनी आरोपीस निर्दोष करणेचा आदेश दिला.

यात हकिकत अशी कि, फिर्यादी खंडू तात्याबा माने याची लहान बहीण मनिषा हीचे सन २००४ साली मौजे हराळवाडी ता. मोहोळ येथील सिध्दू किसन हराळे याचेसोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुली १) सुजाता २) काजल व एक मुलगा ३) समर्थ असे असुन आरोपी ची मौजे गुंजेगाव ता.द. सोलापुर येथे शेती असल्याने फिर्यादीची बहीण मणिषा ही तिचे कुटुंबियांसह शेतातील बंडगर वस्ती येथे राहणेस होती. दि २४/०९/२०२१ रोजी सांय. ०४.३० चे सुमारास मनिषा व आरोपी असे दोघे मिळून फिर्यादी चे घरी भाची नामे सुश्मीता ही डिलेव्हरी झाल्याने तिला बघण्यासाठी आले होते. त्यावेळी मनिषा हीने सांगीतले की, माझा नवरा मला सुमारे दोन महीन्यापासुन मी दुस-याचे शेतात कामास गेल्यानंतर माझे चारीत्रेवर संशय घेवुन मला शिवीगाळ दमदाटी करीत आहे असे सांगीतले.

दि.२५/०९/२०२१ रोजी दुपारी १२.४५ वा चे सुमारास फिर्यादी हा घरी असताना आरोपी सिध्दु किसन हराळे यांचा फोन आला व त्यांने सांगीतले की, माझे हातून घात झाला आहे व मी तुझे बहीणीला जिवे ठार मारले आहे अशी कबुली दिली त्यामुळे लगेच फिर्यादी ने सदर वरील प्रकाराबाबत त्याचे आई, वडील, पत्नी,बहीण यांना सांगीतले. त्यानंतर सर्वजण मिळून मौजे गुजेगाव ता.द. सोलापुर येथील बंडगर वस्ती येथे मनिषा यांचे वस्तीवर दुपारी ०२.४५ वा चे सुमारास गेले तेंव्हा त्यांचे पत्राशेडचे दरवाजासमोर मनिषा पडली होती त्यावेळी तिचे डावे कान फाटुन कानातुन, डोक्यातुन रक्त आले होते. तसेच तिचे तोंडावर,कपाळावर रक्त होते. तसेच तेथे आजुबाजुस देखील रक्त पडलेले होते. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले व फिर्यादीने आरोपीविरुद्ध मनीषाच्या खून केल्याची मंदुप पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती.

यात आरोपीस घटनास्थळावरून अटक केली होती व आरोपीविरुद्ध सखोल तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपीविरुद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी मयतासोबत अनैतिक संबंध असलेला सिद्धू पडवळे याची सरकारपक्षाने नोंदवलेली साक्ष महत्वाची होती.
परंतु आरोपीतर्फे घेतलेल्या उलटतपासात तो खोटे बोलत असल्याचे उघड झाले.

आरोपीतफे अँड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने फिर्यादीस फोनवर दिलेला कबुली जवाब विश्वासार्ह नसून अनैतिक संबंध असलेला साक्षीदार हा मयतावर एकतर्फी प्रेम करीत असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले व त्यापुष्ठर्थ मे.सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले.सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.न्यायालयाने आरोपी सिध्दू किसन हराळे याची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे अँड.संतोष न्हावकर,अँड.किरण सराटे,अँड. वैष्णवी न्हावकर,अँड.राहुल रूपनर,अँड. शैलेश पोटफोडे,अँड श्रेयांक मंकणी यांनी तर सरकारतर्फे अँड.कविता बागल यांनी काम पाहिले.

Tags: Adv Santosh NhavakarMurderSolapur crimeSolapur district court
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर ‘शहर मध्य’ वर आता मुस्लिम समाजाचा अधिकार ; मतांच्या जोरावर आरिफ शेख यांचा दावा

Next Post

“भाई लोग ताई खासदार बनी” ; “चलो MLA की तय्यारी शूरू करो” ! सोलापुरात एमआयएमला गोल्डन चान्स

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“भाई लोग ताई खासदार बनी” ; “चलो MLA की तय्यारी शूरू करो” ! सोलापुरात एमआयएमला गोल्डन चान्स

"भाई लोग ताई खासदार बनी" ; "चलो MLA की तय्यारी शूरू करो" ! सोलापुरात एमआयएमला गोल्डन चान्स

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990197
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group