सोलापूर : दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक बबन कांबळे यांचं निधन झाले आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सडेतोड पत्रकार, विद्वान संपादक, बहुजन चळवळीचा मार्गदर्शक हरपला अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे.
दिवंगत बबन कांबळे हे यापूर्वी दैनिक नवाकाळ मध्ये वरिष्ठ संपादक या पदावर काम पाहिले आहे सडेतोड पत्रकारितेमध्ये त्यांचा राज्यात हातखंडा होता नवाकाळ मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतलेल्या दैनिक वृत्तरत्न सम्राट 2003 साली काढून राज्यातील आंबेडकरी समाजाला दिशा देण्याचे काम केले. दैनिक सम्राटचे अंक वाचण्यासाठी लोक वाट पाहायचे.
नोव्हेंबर 2004 साली वाचक मेळाव्याच्या निमित्ताने ते सोलापुरात आले होते. 17 फेब्रुवारी 2004 साली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सोलापुरात सम्राट पेपर सुरू केला होता, ती बातमी पहिल्या पानावर आली होती अशी आठवण पत्रकार तथा सम्राटचे तत्कालीन जिल्हा प्रतिनिधी विश्वास गायकवाड यांनी दिली.




















