सोलापूर : महालगांव, वैजापूर तालुक्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन पढयंत्र रचणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांची व आमदारांची चौकशी करून तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सोलापुरात निदर्शने करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या दिवशीच गुंडाची उपमा दिली.
सोलापुरात जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, अस्मिता गायकवाड, प्रताप चव्हाण, शरद कोळी, भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, दत्ता वानकर, पूजा खंदारे, मंगल थोरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आली.


















