Friday, September 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तत्कालीन झेडपी सीईओ विरुध्दचा फौजदारी खटला सत्र न्यायालयाकडून रद्दबातल ; खटल्यास शासनाची पुर्वमंजुरी नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 February 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- सन २०१६ मध्ये सोलापुर जिल्हा परिषद येथे सीईओ म्हणुन कार्यरत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी  अरुण किशोर डोंगरे यांचेविरुद्ध माढा येथील कोर्टात दाखल झालेला खटला हा त्यास शासनाची पूर्वमंजुरी नसल्याने तो बार्शी येथील अति सत्र न्यायाधिश जगदाळे सो यांनी रद्दबातल करण्याचा आदेश पारित केला.

याची थोडक्यात हकीकत अशी की, सन २०१६ मध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायत ग्रामसचिवालय मधील तळमजल्यातील आर. सी. सी. बांधकाम असलेला एक हॉल, टेंभुर्णी येथीलच विठ्ठल मध्यवर्ती ग्राहक भांडार यांना करारावर भाड्याने दिला होता. सदरच्या करारामध्ये अनियमितता झाली व त्याअनुषंगाने टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे नुकसान झाले अशा प्रकारची खाजगी फिर्याद टेंभुर्णी येथील रहिवाशी बी. बी. जहागीरदार यांनी माढा येथील फौजदारी न्यायालयात खाजगी फिर्यादीद्वारे केलेली होती. त्यावर माढा न्यायालयाने पोलीस चौकशीचा आदेश करून टेंभुर्णी पोलीसांचा अहवाल मागविला होता. त्याप्रमाणे टेंभुर्णी पोलीसांनी २०१८ साली अहवाल पाठविला होता. सदर फिर्यादीची तक्रारीचा विचार करून न्यायालयाने टेभुर्णी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, जि.प. चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, विठ्ठल मध्यवर्ती ग्राहक भांडाराचे सचिव व इतर दोघेजण अशा एकूण 7 जणांविरुध्द फौजदारी खटला सुरु करून वरील व्यक्तीना माढा येथील कोर्टात आरोपी म्हणून खटल्यास सामोरे जाण्यासाठी, हजर राहणेचा आदेश पारित केला होता.

सदर आदेशास तत्कालीन सीईओ  अरुण डोंगरे यांनी बार्शी येथील सत्र न्यायालयात अॅड. शशि कुलकर्णी यांच्यामार्फत पुर्ननिरिक्षण याचीका दाखल करून, त्यास आव्हान दिले होते. त्यामध्ये त्यांचेविरुध्दचा माढा न्यायालयातील खटला रद्द होणेची मागणी त्यांनी केली होती. त्याप्रमाणे सत्र न्यायालयासमोर अंतिम सुनावणी होवून त्यामध्ये तत्कालीन सीईओ यांचे वकिलांनी असे मुद्दे मांडले की, प्रकरणातील खटल्यात सीईओ हे लोकसेवक असल्याने त्यांचे विरुद्ध खटल्यास क्रि.प्रो.को. कलम १९७ प्रमाणे शासनाची पूर्व मंजुरी गरजेची आहे ती फिर्यादीने घेतली नाही, तसेच सीईओ यांचेविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही.

सदरचा युक्तीवाद व प्रकरणातील कागदपत्रे पाहुन खटल्यास पुर्वमंजुरी नाही या मुख्य मुद्यावर बार्शी येथील सत्र न्यायालयाने सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांचे विरुद्ध माढा येथील चालु झालेला वरनमुद फौजदारी खटला रद्दबातल केला. सदर प्रकरणात तत्कालीन सीईओ  अरुण डोंगरे तर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. मिलींद खुपसुरे, अॅड. अजिंक्य पुराणिक, अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अँड प्रसाद अग्निहोत्री यांनी तर सरकारतर्फे अॅड. पी.ए. बोचरे यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ स्वामी पुन्हा जाणार मसुरीला ; झेडपीचा पदभार देणार कोणाकडे?

Next Post

सुशीलकुमारांच्या विनंतीला मान देऊन जयंत पाटील ‘जनवात्सल्य’ चहासाठी ; साहेब खासदारकी आमचीच बरं का..! चेतन नरोटे यांच्या या फोटोची चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुशीलकुमारांच्या विनंतीला मान देऊन जयंत पाटील 'जनवात्सल्य' चहासाठी ; साहेब खासदारकी आमचीच बरं का..! चेतन नरोटे यांच्या या फोटोची चर्चा

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999637
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group