Wednesday, November 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्याच्या विकास आराखड्यात आल्या ‘या’ सुचना ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नोंद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 February 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्याचा विकास आराखड्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी जिल्हा नियोजन भवनात विविध मान्यवरांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या लेखी सूचना घेतल्या. 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आराखडा तयार करण्याचे अधिकार दिले होते. त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये प्राथमिक बैठक झाली होती.  या बैठकीनंतर शनिवारी नियोजन भवन सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व समावेशक बैठक घेण्यात आली.

या बैठकीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालीनी फडणवीस, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, प्रांताधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, जिल्हा नियोजन अधिकारी गोडसे,  लोकमंगल समूहाचे मनीष देशमुख यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या आराखड्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्रीचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी सोलापूर शहराजवळच 500 एकरात असलेल्या सिद्धेश्वर वनविहारात मुक्कामी सोय करून वनविहार दर्शन घडवावे, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल,  शहरातील फुटपाथच्या कडेने झाडे लावावी, फुटपाथवरील अतिक्रमण काढून वाट मोकळी करावी, ऍग्रो टुरिझम, पर्यटन विकास, वाहतूक सुविधा विमानसेवा यासह यामध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण व कौशल्य विकास, औद्योगिक उत्पादनांसाठी प्रदर्शन केंद्र, गाव तिथे वाचनालय, औषधी वनस्पती उद्यान, पर्यटन केंद्रांची लघुचित्रफितीच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी, तीर्थक्षेत्री येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा, कृषि विद्यापीठाची निर्मिती, पर्यावरण संवर्धन, सौरउर्जेचा वापर, जुन्या धर्मादाय रूग्णालयांचे पुनरूज्जीवन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आयटीहब, स्टार्ट अप, हुतात्मा स्मृती संग्रहालय निर्मिती, कृषिपूरक उद्योग, क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे आदिंबाबत मौलिक सूचना उपस्थित मान्यवरांनी केल्या.  

जिल्ह्याची बलस्थाने शोधून उद्योग, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, महिला बचत गट अशा सर्वच क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी या सूचना उपयोगी ठरणार असून, या सर्वच सूचनांबाबत पालकमंत्री महोदयांना अवगत केले जाईल व त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिली.

SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसचा ‘गांधी’ भाजपच्या वाटेवर ; गांधी झाले पीएम मोदींचे फॅन ; समर्थकांसह वेधले लक्ष

Next Post

ब्रेकींग ! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांची पक्षातून हकालपट्टी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांची पक्षातून हकालपट्टी

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006693
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group