मोहोळ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना मंत्री केले होते, त्यांच्याशी गद्दारी करून गेलेले राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी अशी बेताल वक्तव्य करणे थांबवावे, अन्यथा त्यांना जिल्ह्यासह तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा उपजिल्हाप्रमूख दादासाहेब गायकवाड व महिला आघाडीच्या वतीने सीमाताई पाटील यांनी दिला.
युवा सेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विषयी मंत्री तानाजी सावंत यांनी बेताल व अशोभनीय वक्तव्य केल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोहोळ शहरातील शिवाजी महाराज चौकात मंत्री डॉ सावंत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
या वेळी उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार,तालुका प्रमुख अशोक भोसले,मोहोळ शहर प्रमुख विक्रांत देशमुख,पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड,महिला आघाडी प्रमुख सीमा पाटील, भिमराव मुळे, उपतालुका प्रमुख संतोष चव्हाण, उपतालुका प्रमुख भागवत मुळे, बंडू मुळे, कामगार सेना जिल्हाप्रमुख कयुम शेख, प्रकाश पारवे, सचिन जाधव, जयपाल पवार,सोमनाथ पवार, विनोद आंबरे, विजय गायकवाड, युवा सेना तालुका समन्वयक संदीप चवरे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















