शनिवार 04 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे हिरज ता उत्तर सोलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अभिनव आणि नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविण्यात आला तो उपक्रम म्हणजे माता/ पिता/पाल्य यांचा समन्वय हा होता.
उपक्रमाचा मुख्य उद्देश असा होता की, पालकांमध्ये आणि पाल्यामध्ये समन्वय असावा. ज्यामुळे एकमेकांमध्ये प्रेम, जिव्हाळा,आपुलकी निर्माण होईल.आणि याचा फायदा मुलांना शिक्षण घेत असताना होईल.
सदर कार्यक्रमाची संकल्पना शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी सदगर आणि पडदुणे सर यांची होती. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.


















