सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या एका युवा डॉक्टरने आपल्या राहणाऱ्या क्वार्टर्समध्ये आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. त्या डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे सिव्हिल हॉस्पिटल परिसरात बोलले जात आहे.
डॉ गौरव राजू वाखरे असे त्या डॉक्टराचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई इथले रहिवासी आहेत. 5 नोव्हेंबर 2022 रोजी डॉक्टर वाखरे यांनी डॉक्टर वैशपायन शासकीय मेडिकल कॉलेज याठिकाणी ‘आनेस्थेशिया’ या डिग्री साठी ऍडमिशन घेतले होते.
सिव्हिल हॉस्पिटल मधून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळच्या सुमारास डॉक्टर वाखरे हे आपल्या ड्युटीवर आले नाहीत तेव्हा याबाबत विचारणा झाली असता ते राहत असलेल्या कॉटर्सकडे काही जणांना पाठवण्यात आले. दरवाजा आतून बंद होता खिडकीतून पाहिले असता ते झोपले होते परंतु आरडाओरडा करूनही ते उठत नसल्याने शेवटी दरवाजा तोडण्यात आला आत पाहिले तर ते आपल्या बेडवर आत्महत्या केलेल्या अवस्थेत मिळून आले, अशी माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नाही याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत आत्महत्येची नोंद करण्यात येत आहे.



















