सोलापूर : तुर्की, सीरिया येथे झालेल्या भूकंपमुळे हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. कित्येक जण जखमी झाली आहे. जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर तुर्की,सीरिया मधील संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी व भूकंपात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या आत्म्यांना शांती लाभावी,संकट दूर हो यासाठी बाशा पेठेतील के.एमसी गार्डन येथे सोमवारी शहर काझी मुफ्ती अमजद अली यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली.
तुर्की येथे झालेल्या भूकंपामुळे जगभरातुन मदत सुरू आहे. भारताकडून ही मदत करण्यात आली आहे. या भूकंपामुळे कित्येक जणांची घरे उध्वस्त झाली, हजारोच्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापुरातुन एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली तुर्की मधिल संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी सामूहिक दूआ करण्यात आली. यावेळी सोलापुरातील मुस्लिम बांधव, महिला, चिमुकल्यांनी मोठी बाशा पेठ येथे गर्दी केली होती.
—————
तुर्कीसाठी सर्वांनी प्रार्थना करावी
तुर्की येथे भूकंप मुळे कित्येक जणांचे नुकसान झाले. लोकांचा मृत्यू झाला. कित्येक देशानी या घटनेबद्दल दुःख ही व्यक्त केलं. सर्वांनी मदत ही केली. मदतीतून माणुसकीचा संदेश देण्यात आला. जे आजारी आहेत त्यांना लवकर बर हो, जे संकटात त्यांच्यासाठी प्रार्थना करा,त्यांचं संकट लवकर दूर हो.
अमजद अली,
शहर काझी
————————————————-



















