झेडपी अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क
सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आपल्या पुणे जिल्ह्यातील दोंडे गावात मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या दोंडे गावात कोहिनकर यांनी सोमवारी मतदान केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राची दुरुस्ती व सुविधा पुरविण्याचे काम होते. सोलापुरातील जबाबदारी संपून ते आपल्या गावी मतदानासाठी आहेत.