सोलापूर झेडपीत स्त्री परिचर माध्यमांसमोर ढसाढसा रडली ! आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव, महीला कर्मचाऱ्यांची होत असलेली कुचंबना या सर्व बाबी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन करणाऱ्या आहेत.
दरम्यान एक अर्धवेळ स्त्री परिचर सोमवारी जिल्हा परिषदेत येऊन माध्यमांसमोर ढसा ढसा रडली. तिने आपले गाऱ्हाणे मांडले.
यावेळी सोबत शिवस्वराज्य संघटनेचे प्रतापसिंह कांचन पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, चेतन भोसले हे उपस्थित होते.
सोलापूर जिल्हयातील आमच्या आरोग्य अर्धवेळ स्त्री परीचर भगिनीच्या विविध मागण्याबाबत आपल्याकडे आजपर्यंत विविध प्रकारे पाठपुरावा करणायत आला आहे. अध्याप कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत हे दुर्दैव आहे.
माध्यमांसमोर बोलताना त्या महिला परीचरने आपल्या तक्रारीचा पाढा वाचत ढसा ढसा रडल्या…