सोलापूर : शिवजयंती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी श्री शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्टीत मूर्तींचे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांचा.
शाब्दी यांनी भाषण करताना आपल्या उपस्थिती मागील उद्देश सांगितला. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी शाब्दी यांना निमंत्रित करून आपली मैत्री जपली. दरम्यान शाब्दी यांनी नकळतपणे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली, ज्यांच्या सोबत तुमची आघाडी आहे, तुम्ही सोबत विधानसभेत बसता आणि त्यांनाच ओळखत नाही? मग सर्वसामान्यांना तुम्ही कसे ओळखणार असा प्रश्न करत जे तुमच्यासाठी काम करतात त्यांनाच निवडून द्या असे आवाहन केले.


















