सोलापूर : एमआयडीसी मध्ये गुजरात रबर फॅक्टरीला भीषण आग लागली. आसपासच्या गारमेंट कारखाने यांना ही आगीने घेरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहा पर्यंत धुमसत होती. सोलापूर महापालिका तसेच एमआयडीसी, एनटीपीसी, अक्कलकोट, बार्शी येथून 20 ते 25 अग्नीशमन गाड्या पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही. दरम्यान नुकसान किती झाले याची अद्याप माहिती मिळाली नाही.
परिसरातील ईतर कारखानदार हवालदिल झाले. मिळेल ते साहित्य हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मनपाचे केदार आवटे यांचे सह 25 जणांची टीम आग नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाली होती. गुजरात रबर कंपनीला आग यापूर्वी ही अनेकदा लागली आहे. अशी चर्चा आगीच्या ठिकाणी होती. यावेळी MIDC पोलीस फौजफाटा तळ ठोकून होता. आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते. कोटीपेक्षा अधिक मालमत्ता भस्मसात झाली अशी प्राथमिक माहिती आहे.



















