Monday, June 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या वंशजांच्या उपस्थितीत खड्डा तालीमने केले शिवजन्मोत्सव मंडळाना शिवमूर्तींचे वाटप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 February 2023
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि भोसले कुटुंबामुळे आजचा भारत अस्तित्वात आहे. त्यांचे हिंदुस्थानवरील उपकार न फिटणारे आहेत, असे प्रतिपादन हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती  हंबीरराव मोहिते यांचे १३ वे वंशज श्री जयाजीराव बाजी मोहिते (तळबीड) यांनी केले. खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे मंगळवारी सोलापूर शहर – जिल्ह्यासह राज्यातील शिवजयंती मंडळांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तींचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, डॉ. शिवरत्न शेटे, ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, मतीन बागवान, माऊली पवार, संजय कोळी, विनोद भोसले, रवि कैय्यावाले, श्रीकांत डांगे, राजकुमार पाटील, शंकर चौगुले, जयंत होले पाटील, भूपती कमटम, गजानन कलशेट्टी, बाबूराव जमादार, श्रीकांत जाधव, निलेशकुमार चव्हाण, बाळासाहेब पाटील, लखन झंपले, विलास गव्हाणे, नितीन पाटील, धनंजय पाटोळे, खड्डा तालीम मंडळाचे संस्थापक आणि कार्यक्रमाचे संयोजक सुनिल कामाठी, उत्सव अध्यक्ष जावेद पटेल, कार्याध्यक्ष राजू जमादार आदी उपस्थित होते.

प्रारंभी खड्डा तालीम येथील छत्रपती श्री शिवरायांच्या मूर्तीचे पूजन जयाजीराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मंडळांना मूर्तींचे वाटप झाले.

मोहिते म्हणाले, श्री शिवछत्रपतींचा इतिहास, कार्य अधिक व्यापकपणे पुढील पिढ्यांना कळावे याकरिता खड्डा तालीमचे प्रमुख सुनिल कामाठी यांनी मूर्ती देण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांच्या काळात सर्वांत मोठा आधार शिवचरित्राचाच मिळतो.

माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, छत्रपति श्री शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहचविण्यासाठी सुनिल कामाठी कार्यरत आहेत. शिव जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होण्यात अशा उपक्रमांचा वाटा मोठा आहे.

बळवंत जोशी यांनी सूत्रसंचालन तर राजकुमार माने यांनी आभार प्रदर्शन केले. शिवभक्तांची मोठी गर्दी मूर्तीवाटप कार्यक्रमास शहर जिल्ह्यासह राज्यातील अनेक मंडळांचे शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे १३ वे वंशज जयाजीराव मोहिते यांच्या समवेत छायाचित्र काढून घेण्यास तरुणांनी एकच गर्दी केली होती. दोन वर्षानंतर खुल्या वातावरणात श्री शिवजयंती साजरी होत आहे. त्यामुळे सर्वच शिवजयंती मंडळांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सिद्धाराम म्हेत्रे यांची लहुजी शक्ती सेनेच्या उपोषणाला भेट ; प्रशासनाला दिला हा इशारा

Next Post

जयंतरावांच्या वाढदिनी मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा ; आटपाडीचे सादिक खाटीक यांचा वाढदिवशी स्पेशल लेख

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जयंतरावांच्या वाढदिनी मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा ; आटपाडीचे सादिक खाटीक यांचा वाढदिवशी स्पेशल लेख

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986274
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group