सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक कलशेट्टी यांच्या वाढदिवसा निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जनवात्सल्य येथे त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अशोक कलशेट्टी यांना शुभेच्छा देताना, सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सेवादल ही सेवा करणारी संघटना, काँग्रेस पक्षाच्या चळवळीच्या कामात शिस्त व व्यवस्थितपणा आणायला मदत करणे व जाती-धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे धडे देणे, ही कामे करण्यासाठी संघटना चालवण्यासाठी सहकार्य करणे हे सेवादलाचे काम आहे आणि आयुष्यभर काँग्रेस सेवादलचे कार्य करणारे, सत्ता असो वा नसो अशोक कलशेट्टी वयाच्या पासष्टित सुद्धा आजही पंचवीस वर्षाच्या तरुणांसारखे काँग्रेस पक्षासाठी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची सेवा काम करत आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो. अश्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, नरसिंग कोळी, सुनील रसाळे, NK क्षीरसागर, नागनाथ कदम, हनमंतु सायबोलू, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, VD गायकवाड, हनमंतु रूपनर, चंद्रकांत टिक्के, रवी हुंडेकरी, सलीम मनुरे, अभिलाष अच्युगटला, अयूब नदाफ, मनोहर चकोलेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


















