सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील गलिच्छ वस्ती सुधारणा विभागातील सहाय्यक अभियंता यांना 13 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी साडेचार च्या सुमारास रंगेहात पकडल्याची माहिती मिळत आहे.
सुनील लामकाने असे त्या अभियंत्याचे नाव असून त्याला अँटी करप्शन विभागाने ताब्यात घेऊन सदर बजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोलापूर महापालिकेच्या गलिच्छ वस्ती सुधारणा योजना विभागात ते कार्यरत होते, यापूर्वी झोन अधिकारी, पाणी पुरवठा विभागात त्यांनी काम केले आहे.



















