Tuesday, July 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लोकसभा मतदानासाठी सोलापूर प्रशासन यंत्रणा सज्ज ; मतदान केंद्रात नागरिकांसाठी आहेत या सुविधा ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची सोलापूरकरांना विनंती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 May 2024
in solapur
0
त्या उमेदवारावर आम्ही FIR दाखल करणार ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती ; काय आहे कारण
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा मतदानासाठी सोलापूर प्रशासन यंत्रणा सज्ज ; मतदान केंद्रात नागरिकांसाठी आहेत या सुविधा ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची सोलापूरकरांना विनंती

सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोलापूरची प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांची उपस्थिती होती.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील 42-सोलापूर व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्वच्छता झालेली असून दोन्ही मतदार संघातील एकूण 40 लाख 21 हजार 573 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदार केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद व अप्पर जिल्हाधिकारी तथा 43  लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी केले आहे.

42-सोलापूर लोकसभा मतदारसंघ ची माहिती-
   मतदार –

42(अनु.जा.) लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण व पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघाचे एकूण मतदार संख्या 20 लाख 30 हजार 119 इतकी असून यामध्ये 10 लाख 41 हजार 470 पुरुष मतदार, 9 लाख 88 हजार 450 स्त्री मतदार व 199 तृतीयपंथी मतदार असून 1 हजार 968 मतदान केंद्रावर हे सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

*मतदान केंद्रावरील सुविधा-

42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, मतदाराकरिता सावलीची व्यवस्था, उष्माघातापासून बचावासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार ओआरएसयुक्त पाण्याचा पुरवठा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा, स्वयंसेवकांची नियुक्ती, महिला व जेष्ठ मतदारासाठी स्वतंत्र रांग, मतदान केंद्राचा परिसर व स्वच्छतागृह साफसफाई, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी भिन्न रंगाचा वापर, मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्षाची स्थापना या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

*आदर्श मतदान केंद्र –

42 सोलापूर लोकसभा मतदारसंघात युवक मतदान केंद्र 11, महिला मतदान केंद्रे 11 व दिव्यांग मतदान केंद्र 6 निर्माण करण्यात आलेली आहेत. तसेच 14 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्याप्रमाणेच 1 हजार 42 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.

*कर्मचारी नियुक्ती व वाहतूक व्यवस्था-

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 8 हजार 660 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून वाहतुकीकरीता 334 मार्ग निश्चित केलेले असून त्यासाठी 234 बस, 81 छोट्या बस व 75 जीप वापरण्यात येणार आहेत तसेच 196 सेक्टर ऑफिसर यांना स्वतंत्र जीप देण्यात आली आहे.

*स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्र-

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी  मतदान झाल्यानंतर ईव्हीएम/ व्हीव्हीपॅट मशीन शासकीय धान्य गोदाम रामवाडी सोलापूर येथे ठेवण्यात येणार असून दिनांक 4 जून 2024 रोजी ची मतमोजणी देखील रामवाडी गोदाम येथे होणार आहे.
*85 वर्षे पुढील मतदार व अपंग मतदार-
फॉर्म 12 ड नुसार मंजूर करण्यात आलेले एकूण मतदार 1450 त्यापैकी प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन घेतलेले मतदान तेराशे 46 दोन वेळा भेट देऊनही घरात न आढळून आलेले मतदार 96 घर भेटीदरम्यान एकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी 93.32% इतकी आहे.

*इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट (ईडीसी)-

42 सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वतः मतदारांनी ज्यांनी निवडणूक कर्तव्य नेमलेले आहे असे अधिकारी कर्मचारी यांना शंभर टक्के ईडीसी चे वाटप करण्यात आलेले आहे. एकूण 9464 EDC वाटप करण्यात आलेले आहेत.

43-माढा लोकसभा मतदारसंघाची माहिती-
      *मतदार संख्या-
43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण व माण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 19 लाख 91 हजार 454 इतकी असून यामध्ये 10 लाख 35 हजार 678 पुरुष मतदार, 9 लाख 55 हजार 706 स्त्री मतदार तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 70 इतकी आहे. हे सर्व मतदार माढा लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 30 मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात 10 हजार 236 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.

*आदर्श मतदान केंद्र-

43 माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत युवा मतदान केंद्र 10, महिला मतदान केंद्र 12 व दिव्यांग मतदान केंद्र 6 करण्यात आलेली आहेत.

*85 वर्षे पुढील मतदार व अपंग मतदार-

माढा लोकसभा मतदारसंघात फॉर्म 12 ड मंजूर करण्यात आलेले एकूण मतदार 2226 होते तर त्यापैकी घरामध्ये जाऊन प्रत्यक्षात घेतलेले मतदान 1762 इतके आहे. दोन वेळा भेट देऊनही घरात न आढळून आलेले मतदार 102 इतके आहेत तर घरभेटीदरम्यान एकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी 94.52% इतकी आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी 362 पैकी 316 म्हणजे 87.29 टक्के मतदान झाले आहे.
*इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट (ईडीसी)- 43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वतः मतदार असल्याने ज्यांना निवडणूक कर्त्यावर नेमलेले अधिकारी कर्मचारी यांना  शंभर टक्के ईडीसी वाटप झालेले आहे. एकूण सात हजार सहाशे सहा ईडीसी प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.

*कायदा व सुव्यवस्था-

सोलापूर शहरात शहर पोलीस विभागाच्या वतीने तर ग्रामीण भागात पोलीस जिल्हा अधीक्षक ग्रामीण यांच्यावतीने त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे. दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया शांततामुळे व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात केल्याचेही त्यांनी सांगितले.

*मतदान कर्मचारी व साहित्य मतदान केंद्रावर पोहोचले-

दिनांक 6 मे 2024 रोजी सकाळपासूनच 42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून दिनांक सात मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनरी व आवश्यक निवडणूक साहित्य घेऊन मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत.

*42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया दिनांक सात मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व तयारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तरी उपरोक्त दोन्ही मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आपला हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Tags: Collector kumar ashirwadLoksabha election 2024Madha loksabhaSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील भटके विमुक्त ‘भाजप की काँग्रेस’ सोबत ; भारत जाधव यांच्या पाठिंब्याला 9 समाजाने दिले उत्तर

Next Post

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

ताज्या बातम्या

जगद्गुरू संत तुकारामांची पाऊले सोलापुरात ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आशीर्वाद ; प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पालखीचे सारथ्य

जगद्गुरू संत तुकारामांची पाऊले सोलापुरात ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आशीर्वाद ; प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पालखीचे सारथ्य

1 July 2025
ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

30 June 2025
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

30 June 2025
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1792345
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group