काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशीलकुमार शिंदे आई उज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू असल्याने उन्हामुळे मतदान सकाळ सकाळीच उरकण्यासाठी नागरिक जमा झाले होते.
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, आमच्याही संपवण्यासाठी लढवत आहे. मला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमीभाव द्यायचा आहे , सोलापूर दुष्काळमुक्त, सोलापूर खड्डे मुक्त, युवकांच्या हाताला रोजगार, विमानसेवा सुरू करायची आहे. त्यासाठी माझा प्रयत्न असून निश्चितच सोलापूरचे जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा केला.
मतदानानंतर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ही लढाई संविधान वाचवण्याचे आहे आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू, 400 चा नारा दिला जातो मात्र दोनशे ही पार होणार नाहीत, त्यामुळे त्या चार जून रोजी पहा काय होते ते.