Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांनो, घर घ्यायचे आहे का? शुक्रवारपासून स्थापत्य प्रदर्शन ; यावेळचे वेगळेपण काय असणार वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सतर्फे भरविण्यात येणाऱ्या ‘स्थापत्य २०२३’ या बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२४) नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अमोल मेहता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमास सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, आयकॉन स्टीलचे संचालक श्याम दाड तसेच वितरक बालमुकुंद राठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाचे हे ११ वे वर्ष असून ‘लाईव्ह ग्रीन, सेव्ह ग्रीन’ ही यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. जलपुनर्भरण, सौरऊर्जा, वापरलेले पाणी शुद्ध करून ते झाडांसाठी वापरण्याचे तंत्रज्ञान, देशीगाईच्या शेणापासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तू याबाबत यातून जागृती करण्यात येत आहे.

प्रत्येकालाच नवी इमारत बांधण्याची किंवा बांधलेली इमारत सजवण्याची इच्छा असते. मात्र योग्य अन् उपयुक्त माहिती अनेकदा मिळत नाही. स्थापत्य प्रदर्शनामध्ये एका छताखाली या विषयातील सर्व माहिती व मटेरियल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थापत्य २०२३ प्रदर्शनामध्ये एकूण ८० स्टॉल लावण्यात येत आहेत. यात इंजिनीयर, तंत्रज्ञ, बिल्डर्स, विकासक, व्यावसायिक, सिमेंट, स्टील, प्लंबिंग, सॅनिटरी मटेरियल, दरवाजे, खिडक्या, रुफिंग मटेरियल, टाइल्स, पडदे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल आदी विषयांच्या स्टॉलचा समावेश आहे, असे अध्यक्ष अमोल मेहता म्हणाले.

यंदाच्या प्रदर्शनामध्ये यूपीव्हीसी विंडोज, गाईच्या शेणापासून बनविलेले वैदिक प्लास्टर वॉल पट्टी व पेंट तसेच इ वाहन यांचे विशेष स्टॉल नागरिकांना माहिती देण्यासाठी उभारण्यात येत आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी स्थापत्य २०२३ प्रदर्शनास भेट द्यावी आणि बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष अमोल मेहता यांनी केले.

स्थापत्य प्रदर्शनाचा समारोप रविवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता होणार असून या कार्यक्रमास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आयकॉन स्टीलचे संचालक दिनेश राठी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या पत्रकार परिषदेस प्रदर्शनाचे प्रायोजक आयकॉन स्टीलचे वितरक बालमुकुंद राठी, संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत मोरे, सचिव भगवान जाधव, खजिनदार सिद्धाराम कोरे, सहसचिव चंद्रमोहन बत्तुल, सहखजिनदार मनोज महिंद्रकर सर्व कार्यकारिणी सदस्य  उपस्थित होते.

————-

सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत राहणार प्रदर्शन

स्थापत्य २०२३ प्रदर्शन शुक्रवार २४ ते रविवार २६ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर हे प्रदर्शन पाहण्यास सोलापूरकरांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी स्थापत्य २०२३ ला आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मार्डीत शिवजयंती दिनी आयोजित मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद ; यश फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी उत्तर सोलापूर :

Next Post

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खोखो संघटक शरणप्पा तोरवी यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खोखो संघटक शरणप्पा तोरवी यांचे निधन

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999424
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group