सोलापूर : सोलापूर शहरात मागील महिन्याभरात तीन ठिकाणी मोठ्या आग लागल्या. एमआयडीसीतील गुजरात रबर, दत्त नगरातील रेडिमेड कपडे फॅक्टरीला तसेच बुधवारी लक्ष्मीनारायण थिएटर समोरील टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली सुदैवाने या तिन्ही आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्त आणि मोठ्या प्रमाणात झाली आहे. आग विझवताना अग्निशामक दलाची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. अग्निशामक दलाकडे असलेली तोकडी यंत्रणा, कर्मचाऱ्यांची कमतरता, नसलेले नियोजन यावर भाष्य करताना महापालिका आयुक्तांकडे त्यांनी मागण्या केल्या आहेत ते काय म्हणाले पहा

















