सोलापूर : सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र शासनाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ ०९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. मात्र चार वर्षात या योजनेचे काम महानगरपालिकेच्या लहरीपणामुळे अद्यापही सुरु झाले नाही. समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असे आंदोलन केले.
सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 12 तास चालले. अनेक संस्था संघटनांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला. ठोस आश्वासन मिळेपर्यंत दिलीप माने हे आंदोलन स्थळावरून हटले नाहीत. अखेर या प्रकरणात स्मार्ट सिटी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी दिलीप माने यांच्याशी तब्बल वीस मिनिटे मोबाईलवर चर्चा केली. त्यानंतर माने यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलन मागे घेतल्यानंतर माने यांनी काय माहिती दिली पहा व्हिडीओ…

















