सोलापूर : कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी विविध मागण्यासाठी लोकशाही की पेशवाईचा नारा देत एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या सुचनेनुसार राज्यातील प्रत्त्येक जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही की पेशवाई- एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरूण क्षिरसागर, मनीष सुरवसे, राजेश देशपांडे, अनिल जगताप, अविनाश गोडसे, सचिन घोडके, सचिन साळुंखे, लक्ष्मण वंजारी, कल्याण श्रावस्ती, कांबळे, रमेश गायकवाड, नरसिंह गायकवाड, उमाकांत राजगुरू, नागनाथ धोत्रे, अरविंद जेटीथोर, श्रीशैल कोरे, विजय माने, सचिन सोनवणे, शरण अहिवळे, कुलदीप सोनवणे, विकास रणदिवे, तालुका शाखा पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, उपस्थित होते. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ ,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेनी पाठिंबा दिला.
या आहेत मागण्या
१) मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधे आरक्षण देऊन तात्काळ पदोन्नत्या करण्यात याव्यात.
२) मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती अनुशेष तात्काळ भरण्यात यावा.
३) २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागु करण्यात यावी.
४) वर्ग ४ ची पदे कायमस्वरुपी भरण्यात यावीत.
५) बाह्यस्त्रोत कंत्राटी नोकर भरतीला प्रखर विरोध.

















