सोलापूर :- सोलापुरात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना मोर्चेचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते. हा मोर्चा दत्त चौक परिसरातून जात असताना मोर्चेतील काही युवकांनी हुल्लडबाजी करत शिस्तबद्ध मोर्चाला काळिमा फसण्याचा प्रयत्न केला. परिसरात असलेले अफजान ज्यूस सेंटर या दुकानावर दगडफेक केल्याचे चालकांनी सांगितले. आत बसलेले गिऱ्हाईक घाबरून बाहेर पळाले या दगडफेकीमुळे दुकानाची तोडफोड झाल्याचे दिसत आहे.
या दुकानात काउंटर वर बसलेले दुकानाचे मालक जे ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या दिशेने दगडफेक होत असताना पाणीवेस तालीम मंडळाचे काही तरुण तिथे येऊन त्यांचे संरक्षण करत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखत दुकानाची होणारी पुढील तोडफोड रोखली.
सकल हिंदू समाजाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काढलेल्या या मोर्चामध्ये काही युवकांनी हुल्लडबाजी केल्याने आणि दुकानाचे तोडफोड केल्याने या घटनेबद्दल सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत दुकान मालक यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क करून तक्रार नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे पाणीवेस तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांची सर्व स्तरातून कौतुक होत आहे

















