सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 13 चे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे सोमवारी पहाटे अश्विनी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण सोलापुरातून शोक व्यक्त होत आहे. सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. फेसबुकवर पोस्ट ठेवून त्यांचे समर्थक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत तसेच व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून हे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
दरम्यान नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस मुख्यालय परिसरातील खड्डा तालमी इथल्या त्यांच्या राहत्या घरातून आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून मोदी स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


















