सोलापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा दया, तसेच भरघोस मानधन वाढ करा, कामासाठी लागणारे मोबाईल त्वरीत दया या मागण्यांसाठी राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. काळ्या साड्या घालून शासनाचा निषेध करण्यात येत आहे. सोमवारी आंदोलनाचा सहावा दिवस होता. सर्व अंगणवाडी सेविकांनी हातामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, चहापत्ती, डाळी घेऊन आल्या होत्या. हातात धान्य दाखवत यावेळी जोरदार घोषणाबाजी केली….
दरम्यान राज्य कार्याध्यक्ष सुर्यमणी गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महागाई आज गगनाला भिडली आहे, तुटपुंज्या मानधनावर सेविका कशा जगणार, आंदोलनाचा सहावा दिवस आहे सरकारला जाग येत नाही या शब्दात संताप व्यक्त केला.

















