सोलापुरात प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांनी केले मतदान
सोलापुरात भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर मोठी सभा झाली. एकीकडे ही सभा होत असताना दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
प्रणिती व सुशीलकुमार शिंदे यांनी मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांनी केलेले हे मतदान नेमके कोणते? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान अधिक माहिती घेतली असता समजले की, सोलापूर शहरात जिल्हा न्यायालयातील सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक लागली आहे. त्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे हे दोघेही सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य असल्याची माहिती मिळाली. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांसह कार्यकर्ते एडवोकेट केशव इंगळे यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला.