औंधगाव पुणे येथील एस एम एस ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या गेल्या ५ वर्ष घेण्यात येणा-या औंध चित्रकार स्पर्धा हया वर्षी रविवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या व हया चित्रकार स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ रविवारी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी औंध येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हे चित्रकलेच्या स्पर्धेचे ५ वे वर्ष होते, या स्पर्धा घेण्या मागे उद्देश हा असतो की मुलांमध्ये व मुलींमध्ये लपलेल्या सुप्त गुणांचा व कलेचा विकास होणे हा दरवर्षी असतो.तसेच मुला-मुलींना व वर्षातून एक दिवस हया स्पर्धेतून आनंद मिळावा त्यांच्या चालू परिस्थिती बद्दल त्यांच्या संकल्पना व विचार चित्रकलेच्या माध्यमातून चित्र रूपाने साकारले जावे हा आहे.
एस एम एस ग्रुपचे अध्यक्ष सोनल सराफ यांच्या कडून हया संकल्पनेतून हि स्पर्धा सोनल सराफ स्वता हा वैय वैयक्तिक लक्ष घालून ते मुला-मुली साठी आयोजित करतात हया वेळेस हया स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या ४५० मुला-मुलींमध्ये जाऊन मुला-मुलींना संकल्पनेतले चित्र काढण्यास प्रोत्साहन देत आनंद घेतला.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ रविवारी दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी औंध येथील व बाणेरचे विदयांचल हायस्कूलचे संस्थापक अशोक मुरकुटे ह्यांच्या हस्ते व औंध येथील A V children dental clinic च्या डॉ.अश्विनी फडणीस ह्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या वेळेस ४५० विद्यार्थी व विद्यार्थिनी मधून मुला-मुलींच्या वेगवेगळ्या गटातून ६० जणांना प्रशस्तीपत्रक खाऊ छोटी भेटवस्तू व बक्षिस देण्यात आले व इतरांना प्रशस्तीपत्रक, खाऊ, छोटी भेटवस्तू देण्यात आले. त्यामुळे सर्व मुलांना व मुलींना आनंद झाला.हया वेळेस विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक उपस्थित होते.
यावेळेस मुला मुलींना मार्गदर्शन करताना अशोक मुरकुटे यांनी चित्रकलेचे जीवनातील महत्त्व पटवून सांगताना मुलांना ज्या कलेत जास्त रस असेल त्याकडे पालकांनी लक्ष देऊन त्या कलेत पालकांनी विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे सांगून मार्गदर्शन केले.
हया वेळेस औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद जाधव तसेच गोळवलकर गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सोनल जाधव ह्यांनी उपस्थित राहून स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केले.
शेवटी या स्पर्धा पार पाडण्यासाठी पहिल्या पासून सहकार्य करणाऱ्या महाशक्ती वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा विनया सराफ यांनी परिश्रम घेतले.



















