सोलापूर : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प स्टाफ असोसिएशन यांच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी सोलापुर शाखेचे सचिव आर एस कुलकर्णी, स्वाती शिंगे, आप्पासाहेब तेली, सुरेखा शेरखाने, राजश्री चंदनशिवे, शुभांगी लोणकर, सुरेखा रनशूर, कय्युम शेख, संगीता माताडे, नागेंद्र साबळे, अलका जाधव, एल एल नरोळे, रईसा पिरझादे, श्वेता कांबळे, कीर्ती कन्ना, सुजाता म्हेत्रे, लक्ष्मी कांबळे, शिवराणी तडका, लक्ष्मी मेरगू, वृषाली ठाणेदार, साईदा वडडो यांची उपस्थिती होती.
दरम्यान आप्पासाहेब तेली म्हणाले, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानामध्ये समाविष्ट करून घ्यावे आणि सर्वांचे थकीत मानधन मिळावे. यासाठी हे निवेदन दिले असून येणाऱ्या 15 मार्च रोजी दिल्ली येथे देशपातळीवर या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.


















