श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ महिला विभागामार्फत दिवाळी सणाचे औचित्य साधून गुजराती मित्र मंडळ हॉलमध्ये शॉपिंग उत्सव भरविण्यात आला असून त्याचा शुभारंभ मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
या शॉपिंग उत्सवामध्ये फूड स्टॉल, ड्रेसेस, ज्वेलरी, फुटवेअर असे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत. हा 26 ऑक्टोंबर आणि 27 ऑक्टोबर असे दोन दिवसीय उत्सव राहणार आहे.
याप्रसंगी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, गुजराती मित्र मंडळ महिला विभागाच्या सर्व महिलांनी एकत्र येऊन नवीन उद्योजकांना वाव देण्याचे काम केले आहे आणि महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिले हे कौतुकास्पद असून सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ महिला विभागाच्या अध्यक्षा पारुल बेन पटेल यांनी ही आपल्या भावना व्यक्त करताना आमदार शिंदेंचे आभार मानले.
यावेळी श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाचे उपअध्यक्ष मनिकांत दंड, सेक्रेटरी जयश पटेल, युवा फोरमचे सेक्रेटरी धर्मेश राडिया, समाजातील ज्येष्ठ मान्यवर केशव रांबिया, विजय पटेल, केतन व्होरा तसेच गुजराती मित्र मंडळाचे डायरेक्टर, गुजराती मित्र मंडळाचे महिला विभाग डायरेक्टर व युवक फोरमचे डायरेक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















