सोलापूर : आमदारांच्या कारभारात आणि वाटचालीत त्यांच्या ‘पीए’ ची भूमिका महत्त्वाची असते. एखाद्या ‘पीए’चा अभ्यास किती? तो अधिकाऱ्यांशी वागतो कसं? यावर त्या आमदारांचा दबदबा दिसून येतो. जिल्हा परिषद असेल की जिल्हाधिकारी कार्यालय शहर जिल्ह्यातील आमदारांच्या ‘पीए’चा वावर पाहायला मिळतो. मतदार संघातील कामांचा पाठपुरावा हे सर्व करत असतात.
जिल्हा परिषदेमध्ये आमदार संजयमामा शिंदे यांचे ‘पीए’ संजय आंबोले, अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचे ‘पीए’ आसिफ शेख हे दोन व्यक्तिमत्व कायम पाहायला मिळतात. या दोघांचा वावर जसा जिल्हा परिषदेत असतो तसाच कलेक्टर कार्यालयातही त्यांची धावपळ दिसून येते.
जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी एक असा योगायोग पाहायला मिळाला की चार वेगवेगळ्या आमदारांचे ‘पीए’ एकाच ठिकाणी चर्चा करताना दिसून आले. त्यामध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे ‘पीए’ ओंकार ढेकळे, आमदार सुभाष देशमुख यांचे ‘पीए’ विजय पाटील, आमदार संजयमामा शिंदे यांचे ‘पीए’ संजय आंबोले आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे ‘पीए’ आसिफ शेख हे चौघे जेव्हा एकत्रित माध्यमांना दिसले तेव्हा यांचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
हे चित्र पाहिल्यावर पत्रकारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, हे चौघे नेमकी काय चर्चा करत असतील. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात आपले आमदार सोलापूर जिल्ह्याचा नेमका कोणता विषय मांडणार ही तर चर्चा करत नसतील. असे बोलले जाते की “आम्हा पीए ची जात एकच” सध्या पीए च्या मानधनाचा विषय मागील काही दिवसांपूर्वी चर्चेचा बनला होता, त्या मानधनाची चर्चा यावेळी होत तर नसेल ना असाही प्रश्न पत्रकारांना पडला.
मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर स्वतंत्र पीए असतो. शहरामध्ये प्रशासकीय कामकाज पाहणारे पीए वेगळे, सामाजिक काम पाहणारे पीए वेगळे. या चारही ‘पीए’ चे माध्यमांशी अतिशय चांगले रिलेशन मेंटेन आहे. आपलं काम कसं पटकी झट होतंय यासाठी यांची धडपड असते.


















