सुशीलकुमारांच्या हातावर गोंदवलेला हनुमान ; वडार समाजाच्या मिरवणुकीत काय घडले
सोलापूर : सोलापुरात वडार समाजाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळी वडार समाजाचे नेते तथा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले, माजी महापौर महेश कोठे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह वडार समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या शेजारी महेश कोठे हे थांबले होते. शिंदे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर उपस्थित वडार समाजामधून ‘जय बजरंग, जय वडार’ च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा ऐकताच सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या उजव्या हाताची शर्टाची बाही वर करून उपस्थितांना माझ्या हातावरही हनुमानाचे चित्र गोंदवले असल्याचे दाखवले. त्याचवेळी महेश कोठे यांनी उपस्थित सर्वांना साहेबांच्या हातावर हनुमान आहे पहा असे सांगितले. पहा तो व्हिडिओ…..
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना सुरेश हसापुरे म्हणाले, शिंदे यांचे जय बजरंग बली वरील असलेली श्रध्दा यंदा प्रणिती शिंदे यांना नक्की विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला.