सोलापूर : प्रभाग 7 चे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या निधीतून हांडे प्लॉट येथील मुख्य डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते झाला.
यावेळी एडवोकेट विश्वासराव देवकर, डॉ.यशय्या शिरशेट्टी, विवेकानंद दिघे, संजीवनी हॉस्पिटलचे चंद्रकांत जाधव, प्रवीण व्यवहारे गजानन दिघे, सुरेश ढेरे, संतोष पवार, सुरेश जगताप, सुरज चौहान, योगेश क्षीरसागर, विजय भगरे, नितीन देशमुख, योगेश यादव, अक्षय शिंदे, संजय लोंढे, आण्णा गवळी, सोमनाथ कालेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना बरडे यांनी देवेंद्र कोठे यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले, नकळत त्यांनी काही विरोधी नेत्यांना चिमटे ही काढले. या भागात पुन्हा निश्चितच महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून येतील असा ही दावा केला.
सुवर्णा चोरमुले, रंजना काळे व माता-भगिनींच्या हस्ते पेव्हर मशीनचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर भोसले, पवन खांडेकर, यश शिंदे, सुरज जाधव, सचिन काशीद, धीरज धुरी, जैद बेलीफ, रमण दुडम, राहुल गोयल, नागनाथ मोरे यांनी परिश्रम घेतले.
होणारे रस्ते खालील प्रमाणे
१)भगरे घर ते सुधीर सलगर घर
२)शिवशक्ती हॉटेल ते अडवोकेट विश्वास देवकर घर
३)अवंती नगर डॉ. शिरशेट्टी दवाखाना ते काळे काकू ते जनता बँक

















