सोलापूर : 8 मार्च जागतिक महिला दिन सोलापूर सह परिसरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेतील अर्थ विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान करण्यात आला सर्व महिलांना यावेळी फेटे बांधण्यात आले होते.
मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, लेखाधिकारी कैलास कुंभार, लेखाधिकारी चंद्रकांत पाटील, लेखाधिकारी नादरगी यांच्या हस्ते या महिलाधिकारी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अजय सिंह पवार महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना महिलांच्या योगदानामुळेच भारत देश प्रगतीपथावर असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या सत्काराबद्दल आभार व्यक्त करताना महिला अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

















